प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती, जैन सोशल ग्रुप-डायमंड तसेच पिंपरी-चिंचवड शहर पोलीस यांचे आयोजन
हा उपक्रम 4 जानेवारीपर्यंत उपनगरांमध्ये राबविणार
चिंचवड : प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती, जैन सोशल ग्रुप डायमंड आणि पिंपरी-चिंचवड शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक हात मदतीचा’ या सामाजिक उपक्रमास चिंचवड येथे सुरुवात करण्यात आली आहे. हा उपक्रम 4 जानेवारी 2019 पर्यंत शहराच्या विविध उपनगरांमध्ये राबविण्यात येणार आहे. नूतन वर्षाचे स्वागत वंचितांना मदत करून सुरू करण्यासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती, जैन सोशल ग्रुप-डायमंड तसेच पिंपरी-चिंचवड शहर पोलीस यांच्या प्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. अशा अभिनव सामाजिक उपक्रमाची सुरुवात धनेश्वर मंदिर चिंचवडगाव येथून करण्यात आली. या प्रसंगी चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे, पोलीस निरीक्षक सत्यजित खुळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक डी.जी.कांबळे, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष संतोष छाजेड, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, संपर्क प्रमुख विजय मुनोत, महिला अध्यक्ष अर्चना घाळी, जैन ग्रुप उपाध्यक्ष सुनिल शहा, संतोष चव्हाण, अनुप शहा, पंकज गुगळे, कमलेश भळगट उपस्थित होते.
हे देखील वाचा
स्वेटरमुळे वंचितांचे संरक्षण
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे म्हणाले, कडाक्याच्या थंडीमध्ये ब्लँकेट आणि स्वेटरमुळे वंचितांचे संरक्षण नक्कीच होईल. त्याचप्रमाणे आपल्या शहरात वंचितांचे पालक होण्यास सामाजिक संस्था पुढाकार घेत असल्याचे सामाजिक सुरक्षाही बळकट होईल. प्रदीप लोंढे म्हणाले, वंचितांना मदतीचा हात देण्याचे अतुलनीय कार्य समिती व सोशल ग्रुपच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून होत असल्यामुळे या वर्षी शहर पोलीस ही एक हात मदतीचा उपक्रमात सहभागी झाले. वाढत्या शहरीकरणामुळे वंचितांच्या संख्येतही शहरात वाढ होत आहे. अपंत्वामुळे आणि असहाय परिस्थिमुळे बिकट अवस्थेमध्ये रहात असलेल्या वंचितांना मदतीचा हात देण्यासाठी शहरातील या दोन सामाजिक संस्थांनी पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांनी संयुक्तपणे उपक्रम सुरू केला आहे.
यांनी केले सहकार्य
उपक्रमाचे प्रास्ताविक जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष संतोष छाजेड यांनी केले. प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी उपक्रमाबद्दल माहिती सादर केली. उपक्रमास विशेष श्रम बाबासाहेब घाळी, अतुल धोका, क मलेश गांधी, नरेश शहा, कमलेश चोपडा, मंगेश घाग, विशाल शेवाळे, संदीप सकपाळ, राम सुर्वे, राजकुमार कांबीकर, सतीश देशमुख, लक्ष्मण इंगवले, मीनाक्षी मुनोत, मनीषा जैन, स्वाती शहा, मीना गुगळे, पूनम भळगट, शुभम वाघमारे यांनी केले.