हे देखील वाचा
पिंपरी-चिंचवड : संक्रांत अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये दुकाने सजली आहेत. नवीन सुनेसाठी, बाळासाठी लागणारे हलव्याचे दागिने हे महत्वाचे असतात. संक्रांतीच्या दिवशी होणारा पतंगोत्सव. पतंगांची खरेदी करण्यात दंग असलेली मुले. ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ म्हणून देण्यात येणारी तीळाची वडी, काटेरी हलवा यांची पण विक्री जोरात सुरू आहे.