शिवराजसिंह चौहान यांनी दिला राजीनामा

0

भोपाळ- मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. १५ वर्षापासूनची सत्ता गेली आहे. मध्य प्रदेशमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. परंतू सर्वात मोठा पक्ष असल्याने कॉंग्रेसने राज्यपाल यांच्याकडे सत्ता स्थापनेसाठी वेळ मागितली आहे. भाजपने देखील सत्ता स्थापनेचा दावा करत राज्यपालांची वेळ मागितली होती. मात्र मायावती यांनी पत्रकार   परिषद घेत कॉंग्रेसला    समर्थन देण्याचे    जाहीर केल्याने   भाजपने माघार घेत सत्ता स्थापनेचा दावा न करण्याचा   निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवराजसिंह चौहान राज्यपाल यांच्याकडे राजीनामा देण्यासाठी  जात आहे.

दरम्यान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जनतेने दिलेले कौल आम्हाला मान्य असून भाजपला मिळालेल्या संख्याबळासमोर नतमस्तक होतो असे सांगितले आहे. राज्यपाल यांच्याकडे राजीनामा देण्यासाठी ते जात आहे, त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.