संगणकीकृत सातबारा उतारा वाचनासाठी चावडी मोहीम

0

पाचोरा । अचुक संगणीकृत सात बारा उतारा वाचनासाठी महसुल प्रशासनाच्या वतीने चावडी वाचनाची विशेष मोहिम 1 मे ते 1 ऑगस्ट दरम्यान विविध तारखेला राबविण्यात येणार असून ह्या मोहीमेबाबत माहिती प्रसिध्दीस दिली आहे. 1 मे ते 15 मे 2017 या कालावधीत आपला संगणीकृत 7/12 उतारा अचुक असल्याची खात्री करण्यासाठी संकेत स्थळावर माहिती जाणून घ्यावी. अथवा तलाठी यांचेशी संपर्क साधून सात बारा उतारा तपासून घ्यावा. काही ठरवून किंवा आक्षेप असल्यास तलाठी यांचेकडे तक्रार नोेदावी.15 मे ते 15 जून 2017 कालावधीत संगणीकृत सात बारा उतार्‍याचे चावडी वाचन होणार असून चावडी वाचना नंतरही आक्षेप असल्यास तलाठ्यांकडे संपर्क करावा.16 जून ते 31 जुलै कालावधीत सात बारा उतार्‍याच्या बाबतीत आक्षेपांची माहितीचा विचार करुन दुरूस्त्या करण्यात येतील 1 ऑगस्ट 2017 डिजीटल साक्षरीत संगणीकृत सातबारा उतारे खातेदारांसाठी उपलब्ध करुन देण्यात येतील. तरी सर्व खातेदारांनी वरील मोहिमेत सहभाग नोंदवून आपला अचुक सातबाराच्या अचुकता तपासण्यासाठी महसुल प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जळगाव यांचे आदेशावरुन पाचोरा तालुकासाठी तहसिलदार बी.एस. कापसे यांनी पाचोरा तालुकावाशीयांना केले आहे.