संगमवाडी लहुजी वस्ताद स्मारकासाठी आंदोलन

0

पुणे । क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या संगमवाडी येथील राष्ट्रीय स्मारकाच्या मागणीसाठी मातंग समाजाच्या विविध संघटनाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी विविध संघटनाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. संगमवाडी येथील जागेचे आरक्षण कायम ठेवावे, महापालिकेने स्मारकाच्या निधीचा प्रश्‍न तत्काळ सोडवावा. हा प्रश्‍न तत्काळ न सोडविल्यास प्रत्येक जिल्ह्यात मंत्रांच्या गाड्या अडवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. यावेळी भाजपा सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. आंदोलनानंतर विभागीय आयुक्त यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे समाधी स्मारक ट्रस्ट, लहुजी शक्तिसेना, लहुजी महासंघ, रिपब्लिकन मांतग आघाडी, दलित विकास आघाडी यांसह विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक लोखंडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. विष्णू कसबे, हनुमंत साठे, सुनील खंडाळे, प्रकाश वैराल, बिपिन घोरपडे, मामा केंजळे, रामदास साळवे, भास्कर नेटके, दादासाहेब सोनावणे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.