संगांयोसाठी खोटा पुरावा जोडणे पडले महागात

0

यावल। वयाचा खोटा पुरावा जोडून संजय गांधी योजनचा लाभ लाटणेे एकास महागात पडले आहे. विठ्ठल पंडीत लोहार रा. दहिगाव असे या लाभार्थ्यांचे नाव आहे तर गेल्या चार वर्षात शासना कडून लाटलेले 29 हजार 400 रूपयाचे अनुदान सात दिवसात शासनाकडे परत द्यावे तसेच त्यांच्यावर शासनाची फसवणूक केली म्हणुन फौजदारी गुन्हा का दाखल करून नये अशी नोटीस तहसिलदारांनी बजावल्याने खळबळ उडाली आहे. संजयगांधी निराधार योजनेत विविध लाभार्थ्यांना लाभ दिला जातो यात विठ्ठल पंडीत लोहार रा. दहिगाव यांनी लाभा करीता सादर केलेल्या अर्जात आपल्या वयाचा खोटा पुरावा जोडून श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचा लाभ ऑगस्ट 2012 पासुन घेण्यास सुरवात केली व ऑगस्ट 2016 पावेतो दर महा शासना कडून 600 रूपयाचे वेतन घेतले आहे.

आरोपीने वयाचा खोटा पुरावा जोडल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्या कडे करण्यात आली होती त्या नुसार त्यांच्या प्रकरणातील जोडलेल्या सर्व कागदोपत्रांची पडताळणी करीत चौकशी करण्यात आली व यात किनगाव मंडळाधिकारी यांनी संपुर्ण चौकशी केली असता लोहार यांनी वयाचा खोटा पुरावा सादर करून योजनेचा लाभ घेतल्याचे सिध्द झाले तेव्हा तहसिलदार कुंदन हिरे यांनी लोहार यांना दहिगाव तलाठी व्ही.बी. नागरे यांच्या हस्ते थेट कारणे दाखवा नोटीस बजावली असुन चार वर्षात शासना कडून अनुदान रूपी लाटलेली एकुण 29 हजार 400 रूपयाची रक्कम सात दिवसाच्या आत तहसिल कार्यालयात जमा करण्याचे आदेश दिले आहे तर शासनाची आर्थिक फसवणुक केली म्हणुन त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा का दाखल करू नये या बाबत मीन दिवसात स्वत: उपस्थित राहून खुलासा सादर करण्याचे बजावले आहे तेव्हा या कारवाई मुळे तालुक्यात खळबळ उडाली असुन अशा प्रकारे खोटे कागदोपत्र सादर करून योजनेचा लाभ घेणे महागात पडते हे या कारवाई वरून दिसुन आले आहे.

सात दिवसाच्या आत संपुर्ण रक्कम जमा करणे बंधनकारक आहे तसेच शासनाची आर्थिक फसवणुक केली म्हणुन त्यांचा खुलासा देखील आवश्यक असुन खुलासा न सादर केल्यास त्यांच्या विरूध्द थेट फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला जाईल.
– कुंदन हिरे, तहसिलदार यावल