संघटनात्मक निवडणुकांसाठी सज्ज रहा

0

जळगाव । दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणूकांच्या हालचाली गतीमान झाल्या असुन या निवडणूकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन दिल्ली प्रदेश निवडणूक अधिकारी माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी एका बैठकीत केले. दिल्ली येथे आज संघटनात्मक निवडणूकांसाठी प्रदेश निवडणूक अधिकारी माजी खा.डॉ. उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली. आगामी काळात होणार्या निवडणूकांच्या दृष्टीने या संघटनात्मक निवडणूका महत्वाच्या ठरणार्‍या असल्याचे सांगून या निवडणूकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहनही डॉ. उल्हास पाटील यांनी केले.

यांच्या झाल्या नियुक्त्या
संघटनात्मक निवडणूकांसाठी डॉ. उल्हास पाटील यांनी जिल्हा निवडणूक अधिकार्यांसह जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तया जाहीर केल्या. त्यात करवाल नगर सुरींदर पाल सिंग बिट्टू (जिल्हाध्यक्ष), रोशन जोसेफ (जिल्हा निवडणूक अधिकारी पंजाब), क्रिष्णा नगर सुनिल व्होरा (जिल्हाध्यक्ष), संभानी चंद्राशेखर (जिल्हा निवडणूक अधिकारी तेलंगाना), पटपटगंज लक्ष्मण रावत (जिल्हाध्यक्ष), संदीपसिंग बल(जिल्हा निवडणूक अधिकारी,पंजाब), मेहराऊली राजेश चौहान (जिल्हाध्यक्ष), पवनकुमार मणी (निवडणूक अधिकारी), कारोलबाग मदन खारोल (जिल्हाध्यक्ष), छन्नी सिंग (निवडणूक अधिकारी, काश्मिर), तिलक नगर प्रदिप शर्मा (जिल्हाध्यक्ष), मोहलुद्दीन भाट (निवडणूक अधिकारी), नझफगढ ओम दत्त यादव (जिल्हाध्यक्ष), आबीद कश्मिरी (निवडणूक अधिकारी), चांदनी चौक मोहम्मद उस्मान (जिल्हाध्यक्ष), के.के. अग्रवाल (निवडणूक अधिकारी), आदर्श नगर हरी किशन जिंदाल (जिल्हाध्यक्ष), रजनीश साहोटा (निवडणूक अधिकारी), रोहीणी- इंद्रजित (जिल्हाध्यक्ष), राजेंदर पाल सिंग राणा (निवडणूक अधिकारी) यांचा समावेश आहे.