मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर तसेच शेतमालाला हमीभाव मिळावा म्हणून प्रमुख विरोधी पक्षांतर्फे काढण्यात येत असलेल्या संघर्षयात्रेचा तिसरा टप्पा येत्या २५ तारखेपासून कोल्हापूरपासून सुरू होणार आहे.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा, असा हा टप्पा असून २७ एप्रिलला त्याचा समारोप होईल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, एम.आय.एम., पीपल्स रिपब्लिकन पार्टी, आदी पक्षांचे कार्यकर्ते यात सहभागी होणार आहेत. या तीनही जिल्ह्यात प्रत्येकी एक-एक दिवस, या संघर्षयात्रेतले नेते कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव, या विषयावर जाहीर सभांच्या माध्यमातून लढा तीव्र करण्याचा प्रयत्न करतील. याआधी याच मुद्द्यावर विरोधकांनी चंद्रपूर ते पनवेल आणि सिंदखेड राजा ते शहापूर अशा दोन टप्प्यांत संघर्षयात्रा काढली होती.