यावल येथे खासदार रक्षा खडसे ; न्यू चतुश्रुंगी दुर्गोत्सव मंडळातर्फे आदर्श मातांचा गौरव
यावल- ज्या मातांनी कठीण परीस्थितीतून जीवन जगत मुलांना पुढे आणत त्यांची ओळख जगाच्या पाठीवर करून दिली. या मातांनी केवळ आपल्या कुटुंबापर्यंत मर्यादित न राहता राज्यासह देशात त्यांच्या कर्तुत्वाची छाप पाडली आहे. म्हणूनच त्या आज आदर्श माता गौरव पुरस्कारास पात्र झाल्या आहेत, अशा मातांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन खासदार रक्षा खडसे यांनी येथे केले. न्यू चतुश्रुंगी दुर्गोत्सव मंडळातर्फे आयोजित आदर्श माता गौरव पुरस्कार समारंभात त्या बोलत होत्या.
नऊ आदर्श मातांचा गौरव
न्यू चतुशृंगी दुर्गोत्सव मंडळाने यावर्षीपासून शहरातील आदर्श मातांचा गौरव पुरस्कार सोहळा नवरात्रीत सुरू केला आहे. यात शहरातील नऊ आदर्श मातांचा गौरव यावेळी खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रसंगी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील, आदिवासी विकास प्रकल्पच्या अध्यक्ष मीना तडवी, पालिकेतील गटनेते राकेश कोलते, अन्नपूर्णा पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, मनीष चौधरी,नगरसेवक पौर्णिमा फालक, देवयानी महाजन, रुखमाबाई भालेराव, माजी नगरसेवक भगतसिंग पाटील, जिल्हा परीषदेच्या माजी सदस्य भरत महाजन, बाळू फेगडे, भरत चौधरी आदी उपस्थित होते.
उपवासासोबतच माता-भगिणींचा नेहमीच व्हावा सन्मान -अतुल पाटील
प्रसंगी आदर्श माता गौरव पुरस्कार सोहळ्याचे प्रास्ताविक नगरसेवक अतुल पाटील यांनी केले. याप्रसंगी ते म्हणाले, की नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करून चालणार नाही तर समाजात ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्यांचा खर्या अर्थाने सन्मान आपण संपूर्ण दिवस केला पाहिजे. घराघरात दुर्गामातेची पूजा जर करायची असेल तर या समाजात असलेल्या माता भगिनींचा सन्मान खर्या अर्थाने तो झाला पाहिजे. तो केवळ भाषणातून व्यक्त न होता कृतीतून व्हावयास हवा. राज्यात अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत मात्र यात कष्टकरी शेतकरी महिला संघर्षाला तोंड देत आत्महत्येचा विचारही मनात न आणता खडतरपणे उभ्या राहून जगाला संघर्षाचा संदेश देत आहेत. दीपक जोशी व मनोज बडगुजर यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर यशस्वी स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व रोख पारितोषीक देण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत पाटील, बबलू येवले, संजय पाटील नकूल माळी, गोलू जाधव, गोलू सावखेडकर, गिरीष पवार, गणेश मंदवाडे आदींनी सहकार्य केले.
या आदर्श मातांचा झाला गौरव
सुशीला राजेंद्रसिंग राजपूत, सुरेखा सुरेश सराफ, माया सुरेश गजरे, सुनीता पांडुरंग नेरकर, सरला अनिल चौधरी, मंगला वासुदेव चौधरी, रमाबाई रघुनाथ कवडीवाले, शांताबाई बाबुराव बारी, वत्सलाबाई मधुकर बारी या आदर्श मातांचा गौरव करण्यात आला.