गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक राबवत आहे ऑनलाईन अध्यापन प्रक्रिया
भुसावळ : एकीकडे कोरोनामुळे राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने या संचारबंदीच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, याकरीता सर्व तंत्रशिक्षण संस्थांमधील कामकाज ‘वर्क फ्रॉम होम’ या ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यात येत आहे. भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे हे ऑनलाईन कामकाज पूर्ण करण्यासंदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह व अॅकडेमिक डीन डॉ. राहुल बारजिभे व्हॉट्सअॅप, विडिओ चॅट व इतर ऑनलाइन पध्दतीने मार्गदर्शन करत आहेत.
ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर -डॉ.सिंह
प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रियेद्वारे पाठ्यक्रमानुसार व्हिडिओ तयार करून ते इमेल, व्हॉट्सअॅपद्वारे उपलब्ध करून देत आहे तसेच स्वयंम, इनपीटीएल व इतर ऑनलाईन संसाधनांचा अध्ययनासाठी स्वतः प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी वापर करीत आहे. झूम, गुगल डियोसारख्या ऑनलाईन व्हिडीओ एडिटिंग प्रणालीचा वापर करून प्राध्यापकांनी विषय निहाय व्हिडीओ क्लिप तयार करून विद्यार्थ्यांना पुरवले जात आहे, व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे नेमवून दिलेले कार्य पूर्ण करून घेतले जात आहे, विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण केले जात आहे. प्रश्नावलीची बँक तयार करून अनेक ऑनलाईन पर्याय उपलब्ध करून देण्यात आली आहे. जास्तीत जास्त ऑनलाईन वापर करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळाण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे असे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी सांगितले.
ऑनलाइन माध्यमातून नोट्स व परीक्षा -डॉ.राहुल बारजिभे
प्राध्यापकांनी आयआयटी, एनआयटीद्वारा घेतल्या जाणार्या विविध शैक्षणिक प्रशिक्षणात सहभाग नोंदवला आहे. विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे वर्ष असल्याने त्यांचा वेळ वाया जायला नको. त्यामुळे टेक्नॉलॉजी’चा वापर करून रोज दीड-दोन तास झूम ऍप’द्वारे व्हीडीओ कॉन्फरन्स कॉलिंग’ केले जात आहे. त्यातून मुलांना मार्गदर्शनासाठी ऑनलाइन लेक्चर’ घेत आहोत. झूम ऍप’द्वारे एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांना शिकविणे सुरू असून, मोबाईल व्हॉटस्ऍपच्या माध्यमातून टेस्ट आणि नोटस् देणे सुरू असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात कुठलाही खंड न पडता ते अभ्यासात मग्न राहतात, असे डीन डॉ.राहुल बारजिभे यांनी सांगितले.