संचालक रमेश पाटील यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

0

अमळनेर। येथील ग्राम विकास शिक्षण संस्था मुडी संस्थेतील प्रभारी अध्यक्ष निवडीचा विरोध करण्यात येत आहे. संस्थेत प्रभारी अध्यक्ष निवडीची शिफारस नसतांना निवड करण्यात आल्याचे आरोप संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष उदय नारायण पाटील यांनी 7 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले होते. त्यानंतर संचालक रमेश पाटील यांनी शनिवारी 12 रोजी पत्रकार परिषद घेऊन अध्यक्ष निवड ही कायद्याच्या चौकटीत राहून केल्याचे सांगत निवडीसंबंधीचे सर्व पुरावे देऊ शकतो असे सांगितले. एखाद्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्यास कारभार सांभाळण्यासाठी अध्यक्षांची आवश्यकता असते असे सांगत प्रभारी अध्यक्ष निवड ही कायदेशीर असल्याचे त्यांनी नमुद केले. बेकायदेशीररित्या अध्यक्ष निवडीवरुन संचालक मंडळात मतभेद सुरु आहे. संस्थेची मासिक मिटिंग चालविण्यासाठी अध्यक्षांची गरज असल्याने प्रभारी अध्यक्ष म्हणून पी.पी सूर्यवंशी यांची निवड कार्यकारीणीने केली आहे.

मानहानीचा दावा करणार
तर उदय पाटील यांच्या अध्यक्षतेखालीच पी.पी.सूर्यवंशी यांची तज्ञ संचालक म्हणून नियुक्ती केली होती. अध्यक्षांना घटनेतील नियम 32 प्रमाणे कमी केल्यानंतर प्रभारी अध्यक्षांची निवड ही संचालक मंडळातूनच करण्यात आलेली आहे. शिक्षकांच्या बदल्या व पदोन्नती ह्या नियमानुसारच केलेल्या आहेत. विषय सूची व इतर कागदपत्र दाखविले नाही त्यात प्रभारी अध्यक्षांचा काही एक सबंध नाही. कोणत्याही कर्मचार्‍याकडून बदली व पदोन्नतीसाठी पैश्याची मागणी केलेली नाही त्यामुळे उदय पाटील यांचे आरोप तथ्थहीन असून त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे रमेश पाटील यांनी सांगितले.

हु़कूमशाही पद्धतीने सर्व कारभार रमेश पाटील , सेक्रेटरी सुनील पाटील व त्यांच्या काही संचालकानी सुरु ठेवला आहे. पुतळा बसविन्यासाठीची परवानगी घेतली नाही. घटनेप्रमाणे सेक्रेटरी व कायम संचालक कारभार चालवत नसून कर्मचार्‍यांवर दबाव तंत्र, मनमानी पद्धतीने बदल्या, समायोजन, पदोन्नती न करता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस कारणीभूत ठरत आहेत.
 उदय पाटील

परवानगीची घेतली
22 ऑगस्ट रोजी झेड.डी.सोनवणे हायस्कुल च्या प्रांगणात संस्थेचे संस्थापक स्व विनायकराव पाटील यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. 1991 पासून पुतळा स्थापनेसाठी समिती तयार करण्यात आली आहे. याबाबत ठराव देखील करण्यात आला आहे. पुतळा बसविण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी घेतली आहे तसेच शाळेकडे स्वतःची जागा उपलब्ध असल्याचे पुतळा बसविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.