संजय गांधी निराधार योजनेसाठी 512 लाभार्थी

0

शहादा । शहादा तालुका संजय गांधी निराधार योजनासाठी तालुकास्तरीय बैठक आ.उदेसिंग पाडवी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकी 512 लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करण्यात अली आहेत. लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप लवकर करण्यात येणार आहे. येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार समितीची बैठक घेण्यात आली आहे. समिती अध्यक्ष तथा आ. उदेसिंग पाडवी उपस्थित होते. एकूण 587 लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त झालेले होते यापैकी 75 प्रस्तावात किरकोळ त्रुटी असल्याने नामंजूर केले आहेत. 512 लाभार्थी योजनेस पात्र ठरले आहेत.

सात लाभार्थ्यांना धनादेश वाटप
लाभार्थ्यांवर असलेल्या जाचक अटींची शिथिलता करावी, अशी मागणी आहे. गेल्या दहा वर्षापासून शासनस्तरावर दारिद्र रेषेखालील नागरिकांचे सर्व्हेक्षण झालेले नाही. याच कारणांनी लाभार्थ्यांचे दारिद्र रेषेखालील यादीत अथवा पिवळ्या शिधापत्रिका उपलब्ध होण्यास अवघड ठरले आहे. अनेक लाभार्थी योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्यता योजना अंतर्गत बारा लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये मंजूर झाले आहेत. यापैकी सात लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले आहेत. यात सरीबाई सुरसिंग ठाकरे (कुकडेल), प्रमिलाबाई परसू ठाकरे (गोदिपूर), सुमनबाई सुनील मंदील (टेक भिलटी), लक्ष्मीबाई शिवाजी शेमळे (रायखेड), जतनबाई किशोर ठाकरे (म्हसावद), शेवंताबाई सुभाष सोनवणे (टवळाई), संगीता राजां सोनवणे (कर्जोत), शेवंताबाई करण्या भिल (दुधखेडा), शिलाबाई विजय पाडवी (बिलाडी त.ह.), हिराबाई वीरसिंग पावरा (राणीपूर), शेवंताबाई सुरेश बगळे (अनकवाडे), योगिता गोरखा ठाकरे (सुलतानपूर) असे बारा लाभार्थी आहेत. बैठकीस समिती सचिव तथा तहसीलदार मनोज खैरनार, गटविकास अधिकारी श्रीराम कांगणे, नायब तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, संजय गांधी निराधार योजना नायब तहसीलदार डी. ए. आगळे, अव्वल कारकून के.एन. गावीत, एम.ए. मांडण, विमलदास पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ. किशोर पाटील, अनिरुद्ध मुसळदे, आरती पराडके, कोमलसिंग गिरासे, निलेश मराठे उपस्थित होते.