भुसावळ तालुक्यातून 13 लाभार्थींना लाभ ; आमदार संजय सावकारेंची उपस्थिती
भुसावळ- मयत झालेल्या पतीच्या विधवा पत्नीला मदतीचा हात मिळावा म्हणून शासनाकडून विधवा महिलांना 20 हजारांची आर्थिक मदत दिली जाते. त्यानुसार तालुक्यातील पात्र 13 लाभार्थी विधवा महिलांना मंगळवारी आमदार संजय सावकारे, प्रभारी तहसीलदार संजय तायडे, पंचायत समितीच्या माजी उपसभापती मनीषा संजय पाटील यांनी धनादेशाचे वितरण केले. अकस्मात मयत झालेल्या मयताच्या कुंटुंबातील निराधार झालेल्या पत्नीला शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेतंर्गत मदतीचा हात दिला जातो. यासाठी निराधार पत्नीला आवश्यक कागदपत्रांची तहसी कार्यालयात अर्ज सादर करावा लागतो. यानंतर चौकशी होवून अशा निराधार विधवा महिलांना शासनाकडून 20 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. त्यानुसार भुसावळ शहर व तालुक्यातील 13 महिला या योजनेतंर्गत पात्र ठरल्या आहेत. अशा लाभार्थी विधवा महिलांना मंगळवारी धनादेशाचे वितरण करण्यात आले.
असे आहेत लाभार्थी
कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत एकूण 13 लाभार्थींना प्रत्येकी 20 हजारांप्रमाणे एकूण दोन लाख 60 हजारांचे वाटप धनादेशाद्वारे करण्यात आले. लाभार्थींमध्ये बेबाबाई अरुण सपकाळे (खडका), लक्ष्मीबाई प्रेमराज मगरे (वरणगाव), वत्सलाबाई सिद्धार्थ सपकाळे (सुनसगाव), मंगलाबाई अविनाश बावस्कर (कुर्हा), रेखा काशीनाथ ढाके (सुनसगाव), कमलबाई लक्ष्मण ससाणे (किन्ही), अलकाबाई भास्कर शिंदे (कुर्हे), आशाबाई भिका मोरे (हतनूर), कलाबाई सोपान चौधरी (वरणगाव), प्रमिला देवचंद ठाकरे (तळवेल), कल्पना रवींद्र भैसे (वरणगाव), मंगला ज्ञानेश्वर कोळी (सुनसगाव), रोशनी प्रभाकर धायडे (हतनूर) यांचा समावेश आहे.
विधवा महिलांना दिलासा
शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेतंर्गत विधवा महिलांना आधार मिळावा यासाठी मदतीचा हात म्हणून 20 हजार रूपयाचे धनादेश वितरीत करण्यात आले यामुळे विधवा निरधार महिलांना दिलासा मिळाला आहे तसेच शासनाच्या माध्यमातून निराधार विधवा महिलांना दरमहा 600 रूपये अनुदानही दिले जात असल्याने विधवा महिलांच्या संसारास यामुळे हातभार लागत असल्याने निराधार महीलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.