पंधराशे प्रकरणाचा होणार निपटारा : अपंग व्यक्तींना वाढले अनुदान
चाळीसगांव- येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना , श्रावण बाळ योजना तसेच अपंग बांधवांना देण्यात येणारे शासकीय अनुदानासाठी आलेल्या लाभार्थ्यांच्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी मॅरेथॉन बैठक सुरू आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तथा भाजपचे तालुकाध्यक्ष के.बी. साळुंखे आहेत. यावेळी नायब तहसीलदार नानासाहेब आगळे, समिती सदस्य माजी नगरसेवक मालजी घोडेस्वार, माजी प.स.सदस्य सुवर्णाताई मांडोळे, बाजार समितीचे माजी सभापती मच्छिंद्र राठोड , सामजिक कार्यकर्ते दिनकर राठोड, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, दिव्यांग भगिनींच्या सर्वेसर्वा मीनाक्षीताई निकम, शांताराम नेरकर , रंजनाताई पवार , चुडामण पाटील, गटविकास अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी के.व्ही.माला जंगम , अव्वल कारकून आर.आर.जाधव, एम.डी.पाटिल , इंदिरा गांधी योजना अव्वल कारकुन पी.एस.राजपूत , एस.आर.राठोड, नगर परिषद मुख्याधिकारी यांचे प्रतिनिधी तथा शहर अभियान व्यवस्थापक किरण निकम, तहसीलदार कार्यालयातील विविध योजना कर्मचारी आदींची उपस्थिती आहे.
प्रकरणाची संख्या पाहता ही बैठक सायंकाळ पर्यंत सुरू राहील अशी शक्यता आहे