मुंबई : अभिनेता संजय दत्त याचा बायोपिक ‘संजू’ प्रदर्शित झाल्यानंतर कमाईचे अनेक रेकॉर्ड बनवत आहे. परंतु, प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच हा सिनेमा इंटरनेटवर लीक झाला. हा सिनेमा फेसबुकवरही अपलोड करण्यात आला. शिवाय हा सिनेमा एका वेबसाईटवरही अपलोड करण्यात आला. ‘टोरंट’वरही हा सिनेमा लीक करण्यात आला. काही युझर्सने याचे स्क्रीन शॉट ट्विटरवरही शेअर केले.
कारवाईच्या भीतीने नंतर मात्र, फेसबुकवरून हा सिनेमा हटवण्यात आला. परंतु, अद्यापही ‘संजू’ सिनेमाची हाय डेफिनेशन प्रिंट इंटरनेटवर पाहायला मिळते आहे. रणबीरच्या फॅन्सनं यावर आपली नाराजी व्यक्त केलीय… तसंच प्रेक्षकांना हा सिनेमा सिनेमाघरात जाऊन पाहण्याची विनंती केली आहे.