नाशिक । सटाणा शहराला लागून असलेल्या मळगाव येथील देशी दारूच्या दुकानावर आज संतप्त महिलांनी हल्लाबोल केला. महिलांनी देशी दारुच्या संपूर्ण दुकानाची तोडफोड करुन त्याला आग लावली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संतप्त महिलांच्या जमावाने पोलिसांनाही धक्काबुक्की केली. मळगाव येथील देशी दारुच्या दुकानात येणारे तळीराम हे रात्रीच्या वेळी गावातील महिलांना त्रास देत असे. वारंवार होणार्या या घटनेच्या वैतागलेल्या महिलांनी अखेर आज या विरोधात आवाज उठवला. संतप्त महिलांच्या जमावाने मळगाव येथील दारुच्या दुकानाची तोडफोड केली.