संतांच्या फलकाची विटंबना करणार्‍यास अटक करा

0

धुळे । लिंगायत समाजाच्या कर्नाटकातील असंतोषाचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने धुळ्यातील संत बसवेश्‍वर यांच्या फलकाची विटंबना अज्ञात समाजकंटकाने केली. अज्ञातांवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. समाजबांधवांनी त्याच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे.

सकाळी निदर्शनास आली घटना
शहर पोलीस ठाण्याच्या निरिक्षकांना दिलेल्या निवेदनात, महात्मा बसवेश्‍वर जयंती असतांना बारा पत्थर चौकातील महात्मा बसवेश्‍वर यांच्या नावाने असलेल्या सिमेंटच्या स्तंभाची विटंबना करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार आज पहाटे 5 च्या सुमारास निदर्शनास आला असून पोलिसांनी या माथेफिरूस तत्काळ शोधून त्याच्यावर कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली. नगरसेवक शशि मोगलाईकरसह किशोर लिंगायत, सचिन कर्णे, वाल्मिक लिंगायत, तुषार लद्दे, नितीन गुळवे, राकेश गादगे, दिनेश डोंबरे, विक्की कर्णे आदी उपस्थित होते. दरम्यान, महात्मा बसवेश्‍वर यांची जयंती असल्याने तातडीने स्तंभ धुण्यात येवून संत बसवेश्‍वर मुर्तीला अभिवादन करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह माजी नगरसेवक शशि मोगलाईकरसह चेतन मंडोरे, चलु आवळकंठे, अक्षय बनसोडे, चंद्रशेखर बनसोडे, नंदु वैद्य, शिवलिंग वाफेकर आदी उपस्थित होते.