पुणे : कठुआ, उन्नाव आणि सुरतमध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलींवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणाचे तीव्र पडसाद संपुर्ण देशभरात अजूनही उमटत आहेत. मेणबत्ती मोर्चा, निषेध मोर्चांचे आयोजन रविवारी अनेक शहरांमध्ये करण्यात आले होते. पुणेसह दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, गोवा, भोपाळ, केरळा येथे हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. कठुआ आणि उन्नाव प्रकरणाने मागील दोन आठवड्यांपासून देश हादरला आहे. त्यातच सुरतमध्ये नऊवर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिला ठार मारण्याचे प्रकरण उघडकीस आले. या मुलीच्या मृतदेहावर तब्बल 80 जखमा होत्या.