संतोष बारसेसह तीन जण किरकोळ जखमी

0

पहुरजवळ चारचाकी उलटली ; लग्नाला जाताना अपघात

भुसावळ– भरधाव चारचाकी रस्त्याच्या कडेला घेताना उलटल्याने भुसावळातील संतोष बारसेसह तीन जण किरकोळ जखमी झाले. हा अपघात रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पहूरजवळ झाला. या अपघातात माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्यासह निखील राजपूत व प्रफुल्ल पाटील हे किरकोळ जखमी झाले. राजपूत व पाटील यांना 108 रुग्णवाहिकेद्वारे भुसावळ येथील खाजगी दवाखान्यात उपचारार्थ हलवण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार श्रीरामपूर येथे शिव पथरोड यांचा विवाह समारंभ असल्याने बारसे यांच्यासह प्रफुल्ल पाटील, निखील राजपूत, किशोर जाधव, कपिल ढिंक्क्याव, अमोल राणे, चुन्नी खरारे आदी मित्र मंडळी झायलो (एम.एच.19 बी.9121) ने जात असताना अपघात झाला.

सात वेळा उलटले वाहने, संतोष बारसे बचावले
सुसाट वेगातील वाहन रस्त्याच्या कडेला घेताना रस्त्याच्या खाली उलटले तर तब्बल सात वेळा वाहनाने पलटी खाल्ल्याचे सूत्रांनी सांगितले तर अपघातात वाहनाचा चक्काचूर झाला. बारसे यांच्यासह अन्य साथीदार सुदैवाने बचावले.