संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे निकाल जाहीर

0

जळगाव । जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन उपक्रमांतर्गत राष्ट्रसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 2016-17 अंतर्गत जिल्हास्तरीय समितीकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची तपासणी करण्यात आली होती. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभाग नोंदविले होते. अभियानानिमित्त स्पर्धा घेण्यात आली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्द ग्राम स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला असून प्रथम क्रमांक अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे या गावाला मिळाला आहे. द्वितीय क्रमांक चोपडा तालुक्यातील घुमावल तर तृतीय क्रमांक भुसावळ तालुक्यातील फुलगावला मिळाला आहे.

विशेष पुरस्कारासाठी देण्यात येणारा निकाल देखील जाहिर करण्यात आला. पाणी, सांडपाणी व्यवस्थापन कार्याबद्दल देण्यात येणारा स्व.वसंतराव नाईक हा विशेष पुरस्कार एरंडोल तालुक्यातील टोळी या गावाला मिळाला आहे. कुटुंब कल्याण कार्याबद्दल देण्यात येणारा स्व.आबासाहेब खेडकर पुरस्कार रावेर तालुक्यातील सुलवाडी या गावाला मिळाला आहे. सामाजिक एकतेबद्दल देण्यात येणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार भुसावळ तालुक्यातील टहाकळी या गावाला मिळाला. 4 जुन 2016 च्या शासन निर्णयानुसार ही स्पर्धा घेण्यात आली. उपसचिव पाणी व स्वच्छता विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्याकडील पत्रान्वये ही स्पर्धा घेण्यात आली.