पाचोरा । येथील सुवर्णकार समाजाच्या मंगल कार्यालयांत संत नरहरी महाराजांच्या मंदिराचे भुमीपुजन निखील सोनार व त्यांच्या पत्नी तेजस्वीनी सोनार यांच्या हस्ते पार पडले. गुरूवार 13 जुलै 2017 रोजी अरवींद सोनार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंदिरांच्या कामाचे भुमीपुजन मंडळाच्या सदस्यांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात पार पडले.
राजाराम सोनार यांनी केले नेतृत्व
यावेळी समाजाचे अध्यक्ष राजाराम नागोशेठ सोनार यांनी मार्गदर्शन केले. वास्तूतज्ञ गिरीष दुसाने यांनी मंदिरासाठी वास्तूशास्त्राप्रमाणे जागा ठरविण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष जगन्नाथ सराफ, सचिव मनिष भास्करशेठ बाविस्कर, माजी नगरसेवक दत्तात्रय जडे, माधवशेठ भडगांवकर, राजेश मोरे, गजानन सोनार, नवयुवक मंडळाचे माजी अध्यक्ष ललित सोनार, माजी नगरसेवीका लताबाई सोनार, रत्नाबाई पिंगळे, शोभा सोनार, कार्यालय व्यवस्थापक विकास राऊतराय, राजेद्र बिरारी आदी उपस्थित होते.