संत मिराबाई नगरात हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

 

जळगाव – लग्नावेळी हुंडा दिला नाही म्हणून संत मिराबाई नगरात विवाहितेचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी मंगळवारी २५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता पतीसह तीन जणांविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी कि,  जयश्री तुषार सोनवणे (वय-३६) रा. संत मिराबाई नगर जळगाव यांचा विवाह ३० एप्रिल २०१८ रोजी जळगावातील डीएमसी कॉलनीत राहणारे तुषार अशोक सोनवणे यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे काही दिवस सुरुवातीला चांगले गेल्यानंतर पती तुषार सोनवणे यांनी लग्नात हुंडा कमी दिला म्हणून त्यांना टोमणे मारणे सुरू केले. त्यानंतर सासू आणि दीर यांनी माहेरहून पैसे घेऊन यावे यासाठी विवाहितेला मानसिक व शारीरिक त्रास दिला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. विवाहितेने मंगळवारी २५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन झाल्याची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती तुषार अशोक सोनवणे, सासू प्रमिलाबाई अशोक सोनवणे आणि दीर अमोल अशोक सोनवणे सर्व रा. डीएमसी कॉलनी ओम नगर, जळगाव यांच्या विरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक कालसिंग बारेला करीत आहे.