संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात

0

मुक्ताईनगर। येथे माळी समाज मंगल कार्यालयात संत शिरोमणी भिमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा भोई समाजाचे अध्यक्ष एस.ए. भोई होते तर प्रमुख पाहुणे म्हणून छोटू भोई, हरणे महाराज, उध्दव जुनोने, पंचायत समिती सदस्य भारती भोई, भास्कर वानखेडे, अलका घाटे, हरिभाऊ भोई, मधुकर भोई, मदन भोई होते. कार्यक्रमाची सुरुवात संत भिमा भोई यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली. प्रास्ताविक विनायक वाडेकर यांनी केले.

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रशस्तीपत्र देवून करण्यात आले. तसेच भोई समाजाचे तालुकाध्यक्ष छोटू भोई यांना समाजभूषण देवून गौरविण्यात आले. यावेळी एस.ए. भोई, छोटू भोई, रघुनाथ ढोले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अश्‍विन भोई, प्रविण भोई, रविंद्र भोई फकिरा भोई, अशोक भोई, अतुल भोई, गणेश भोई, संजय वाडिले, बाळू भोई, सुभाष भोई, गणेश भोई, मनोज भोई, सुनिल भोई यांनी सहकार्य केले.