संत सखाराम महाराज यात्रोत्सवात निघाली अमळनेरातून रथाची मिरवणूक

0

अमळनेर । संपूर्ण खान्देशचे धार्मिक वैभव मानला जाणारा संत सखाराम महाराज यात्रोत्सवाला खर्‍या अर्थाने 5 पासून प्रारंभ झाला असून सकाळी मनू महाराज बेलापूरकर यांच्या दिंडीचे आगमन झाले. 6 रोजी सायंकाळी 6 वाजता रथाची मिरवणूक काढण्यात आली. बेलापूरकर हे अमळनेर कर महाराजांचे शिष्य घराणे आहे संत सखाराम महाराज संस्थानचे गाधीपती प्रसाद महाराज हे मनू महाराजांचे गूरू आहेत. शिष्याच्या स्वागताला गूरूने जाण्याची परंपरा आजही अखंडीत सूरू आहे. 5 रोजी सकाळी बेलापूरकरांच्या दिंडीचे धूळे रोडवरील आर.के. नगरजवळ गाव वेशीवर प्रसाद महाराजांनी स्वागत करून वाजत गाजत वाडी संस्थान दिंडी पोहचली. त्यांचे समवेत हातात टाळ मृदूंग व खांद्यावर भगवाध्वज मूखी हरिनाम जपत वारकर्‍यांचा समावेश होता. संध्याकाळी वाडी संस्थानात धार्मिक कार्यक्रम सूरू होते. रथाला आज बाहेर काढून त्याल तेलपाणी करून स्वच्छ करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी रथाची मिरवणूक शहरातून जयघोषात उत्साहात निघाला.

यात्रेचा प्रारूप आराखडा तयार करून यात्रेकरूंसाठी शिस्तबद्ध व्यवस्था
पालीका प्रशासनाने बोरीनदी पात्र पूर्णपणे निर्मळ करून 24 तास पिण्याच्या पाण्यासह यात्रेचे प्रारूप आराखडा तयार करून यात्रेकरूंसाठी शिस्त बद्ध व्यवस्था केली आहे. गेल्या 50 वर्षात प्रथमच बोरीनदी पात्राची स्वच्छता करण्यात आली असून स्वच्छ भारत अभियानाचा खरोखर अमळनेर शहरात पालन करण्यात येत आहे. माजी आमदार साहेबराव पाटील यांनी पालिका प्रशासनाच्या मदतीने व सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांच्या प्रयत्नांनी सार्थ ठरविलेला आहे. आराखड्यानुसार पारंपरिक व्यावसायिकांची थोडी गैरसोय होणार असली तरी यात्रोत्सव शिस्तबद्ध होण्यासाठी प्रत्येकांचे सहकार्य गरजेचे असल्याचे प.पु.प्रसाद महाराज यांनी केले होते. वाडी संस्थानपासून रथाची मिरवणूक सूरू झाली. पानखिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, फरशी पूलावरून पैलाड मार्गे कसाली मोहल्यातून पून्हा वाडी संस्थानात पोहचली.

प्रसाद महाराजांना मान
सजविलेल्या रथोत्सावाची लालजींची मूर्ती विधिवत पूजा करून ठेवण्यात आली. त्या मागे आद्य सखाराम महाराजांच्या पादूकांची पालखी व मागे प्रसाद महाराज होते त्यांच्या मार्गदर्शनाने हा उत्सव पार पडला. प्रशासनाच्या वतीने रथ मिरवणूकिच्या तयारी बाबत पोलीस महसूल व पालीका प्रशासनासह सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक महाराजांच्या उपस्थीतीत वाडी संस्थानमध्ये झाली. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा व पालिका पोलिसांनी वाढीव पोलीस बंदोबस्त ठेवला होता. 10 पालखी मिरवणूक निघेल 15 दिवस बोरी पात्रात ही यात्रा भरते.