संदीप, आयेशा मोहम्मदला विजेतेपद

0

मुंबई । पाचवे मानांकन मिळालेल्या संदीप दिवेने सहाव्या मानांकित गिरीश तांबेची लढत तीन सेटमध्ये 25-8,7-25,25-14 अशी मोडून काढत जुहु विलेपार्ले जिमखाना आयोजित जोड जिल्हा कॅरम स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. महिला एकेरीच्या लढतीत दुसर्‍या मानांकित आयेशा मोहम्मदने अव्वल मानांकन मिळालेल्या काजलकुमारीवर 25-2, 25-7 असा विजय मिळवत अजिंक्यपद मिळवले.

त्याआधी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये संदिपने अग्र मानांकित रियाझ अकबर अलीला हरवले होते. या सामन्यात संदिपने रियाझवर 10-25, 25-13, 25-15 असा विजय मिळवला होता. तर गिरीशने निर्णायक फेरीत स्थान मिळवताना हिदायत अंसारीला 7-25, 25-7, 25-18 असे हरवले होते. महिलांच्या लढतीत काजलकुमारीने जान्हवी
मोरेचा 25-0, 25-9 असे हरवले होते.