संदीप, विकास धारियाची आगेकूच कायम

0

मुंबई। तिसरा मानांकित संदीप देवरुखकर आणि चौथ्या मानांकित विकास धारीयाने जुहुविलेपार्ले जिमखाना आयोजित दुसर्‍या जोडजिल्हा कॅरम स्पर्धेतली आगेकूच कायम राखली आहे.

संंदीपने जैन इरिगेशनच्या योगेश धोंगडेचा 25-16, 25-19 असा पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळवले. अन्य लढतीत विकास धारियाने राहुल सोळंकीची कडवी लढत 25-13, 10-25, 25-7 अशी मोडून काढत पुढच्या फेरीत प्रवेश केला. माजी राज्य विजेता दिलेश खेडेकरनेही दिलीप सोसाचा प्रतिकार 25-17, 9-25, 25-14 असा मोडून काढला.अन्य निकाल (तिसरी फेरी) : रियाझ अकबर अली विजयी विरुद्ध निलेश परब 25-1, 25-4. अलंकार नाईक विजयी विरुद्ध वैभव पवार 25-17, 25-13. वैभव शिंदे विजयी विरुद्ध विनोद बारिआ 25-6, 25-8.