‘संदेश लायब्ररीतर्फे रिक्षा पोस्टर मोहीम’

0

पुणे । समाजात ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्‍न खूपच भेडसावत आहे. सोशल मीडियाच्या अभासी जगात मुले माता-पित्यांबरोबर संभाषणसाठीही वेळ देत नाहीत. संगोपनपणासाठी पालकांनी घेतलेले कष्टही तरुणपिढी विचारात घेत नाही. अशा या वातावरणात तरुणांचे प्रबोधन करण्याच्या उद्देशाने संदेश लायब्ररीतर्फे दिव्य कुरआनातील ओवीद्वारे प्रबोधनात्मक 100 पोस्टर्स रिक्षांवर लावण्यात आली आहेत.

या पोस्टरमधील ओवी ‘आई-वडिलांशी सद्वर्तन करा, जर तुमच्यापाशी त्यांच्यापैकी कोणी एक अथवा दोघे असतील तर त्यांच्यासाठी ‘ब्र’ शब्दही काढू नका व त्यांना झिडकारून प्रत्युत्तरदेखील देऊ नका!’ आई-वडिलांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, प्रत्येक मुलाचे हे कर्तव्य आहे की, त्याने त्याच्या आई-वडिलांचा योग्य रितीने सांभाळ केलाच पाहिजे, असे आवाहनही यानिमित्ताने केले आहे.