संपकऱ्यांना भर पावसात घ्यावा लागला एमआयडीसीच्या बसचा आसरा

0

मुंबई – गेल्या आठ दिवसांपासून अंधेरीत एमआयडीसीतील कामगार रुग्णालयातील परिचारीकांनी केलेल्या संपाचा बुधवारी नववा दिवस उजाडला. त्याच पावसाचा हंगाम सुरू झाल्याने संप करण्यांची अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच पावसाने मध्ये जोर घेतल्याने आता या संपकऱ्यांना एमएमआरडीएच्या बसचा आसरा घ्यावा लागला आहे. मात्र रुग्णालयातील प्रशासनाने अद्याप संपावर अद्याप काहीही निर्णय दिलेले नाही.

रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारीकांच्याच आरोग्याचा प्रश्न
अंधेरीतील कामगार राज्य महामंडळ रुग्णालय येथे परिचारीकांचा गेले आठ दिवस संप चालू रुग्णालय प्रशासन काहीह तोडगा काढत नसल्याने गेल्या दोन दिवसांपासून संपकऱ्यांनी एमएंआरडीएच्या रस्त्याच्या बाजूला उभ्या बसचा आसरा घेतला आहे. एकंदर 130 परिचारीकांनी संप पुकारला असून वाढत्या पावसाचा त्रास या संपकऱ्यांना सहन करावा लागत आहे. बेभान कोसऴणाऱ्या पावसात रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारीकांच्याच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र आपल्या आरोग्याची पर्वा न करता या परिचारीकांनी आपला संप चालूच ठेवला आहे.

संपाचे कारण काय?
अंधेरीतील कामगार राज्य महामंडळ रुग्णालय येथे परिचारीकांचा गेले आठ दिवस संप चालू असून त्याचा फटका सामान्य रुग्णालय आणि प्रशासनावर पडलेला आहे. या संपामुळे मोठ्या शस्त्रक्रिया आणि रुग्णांनी भरती करुन घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तडकाफडकी परिचारीकांच्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी औरंगाबाद येथे पाठवण्यात आल्याने या रुग्णालयातील परिचारीकांनी संप केला असल्याची माहिती संपात सहभागी सदस्यांनी दिली. संप सुरु झाल्यापासून एकदा या संपकऱ्यांना रूग्णालय प्रशासनाने बोलवून रुग्णालयाचे नियम पाळण्याचे आदेश दिले. मात्र परिचारीकांनी अद्याप संप मागे घेण्याचा निर्णय घेतलेला नाही.

संपकऱ्यांचे म्हणणे
कांदिवली, वाळुंज, बीबवेवाडी, पुणे तेथे आमच्या रुगणालयाचे छोटे दवाखाने सुरू होतात तेव्हा परिचारीकांची बदली केली जाते. याआधीही बऱ्याचदा परिचारीकांची बदली करण्यात आली होती. मात्र तेव्हा परिचारीकांच्या इच्छेनुसार म्हणजेच त्यांना तिथे जायचे आहे का? याचा सारासार विचार करुन बदली करण्यात येत होती. मात्र यंदा मात्र परिचारीका युनियनच्या पदाधिकाऱ्यांची तडकाफडकी किंवा कोणतीही पूरव सूचना न देता बदली करण्यात आल्याने आम्ही संपाचे शस्र उगारले आहे. 1 महिना किंवा याच्यापेक्षा कमी कालावधीसाठी आम्हाला पाठवण्यात येत असेल तरच आम्ही संप मागे घेऊ. मात्र रुग्णालय प्रशासन आमची ही मागणी पूर्ण करत नाही. एवढ्या पावसात आम्ही आमच्या मागण्या मांडत आहोत मात्र रुग्णालय प्रशासन अद्याप याकडे लक्ष द्यायला तयार नाही. आता पाऊस येऊ दे नाही तर वादळ आम्ही आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही, असे संप करणाऱ्या परिचारीकांनी सांगितले.

रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे
रुग्णालयाने काही दिवसांपूर्वी परिचारीकांच्या युनियन पदाधिकाऱ्याची बदली केली होती. मात्र ही बदली नसून त्यांना काहीच दिवस तेथे राहायचे असून रुग्णालय प्रशासन पुन्हा त्यांना बोलावून घेणार आहेत. आधी याची मर्यादा आम्ही एक वर्षाची ठेवली होती. आता या परिचारीका युनियनने केलेल्या विरोधामुळे आम्ही ती मर्यादा 2 महिन्यांवर आणली आहे. तरी युनियन आपला संप मागे घेत नाही. याआधीही या युनियने संप केले आहेत. रुग्णालयात या युनियनच्या परिचारीकांनी रुग्णांना एनिमा देणे बंद केले, बेड मेकींग बंद केले, ब्लड प्रेशरचे ब्लड सॅम्पल देणे केले. त्यामुळे या संपकऱ्यांना फक्त स्वत:च्या फायद्याचे दिसते. रुग्णांच्या आरोग्याचे काय? याचा त्यांना काही विचार करावासा वाटत नाही. मात्र त्यांच्या या संपामुळे आपचे काहीही बिघडत नाही. आमच्या रुग्णालयाचे काम सुरङीत सुरू आहे, असे रुग्णालयाचे आरोग्य अधिक्षक डॉ. गुरुमुखी यांनी सांगितले.

भर पावसात रुग्णांचे हाल
शहरत पावसाचा जोर वाढला असताना युनियनने सुरू केलेला संप, संपामुळे परिचारीकांचा तुटवडा आणि रुग्णालय प्रशासन संपावर कोणताही तोडगा काढत नसल्याने याच रुग्ण मात्र भरडला जात आहे. पावसाळ्या वाढणारे साथीचे आजार यामुळे रुग्णालयात रुग्णाची वाढ होत असते. मात्र रुग्णालयाच्या या बेपर्वा प्रशासनामुळे आणि कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांनी कामगार रुग्णालयाकडे पाठ फिरवली आहे. रुग्णालयात रुग्णांच्या मदतीला कोणीही उपलब्ध नसल्याने रुग्णांची होणारी गैरसोय ही रुग्णालयातील मोठी समस्या आहे, रुग्णालयातील अनेक वॉर्ड बंद करुन ठेवण्यात आहे आहेत, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका रुग्णाने दिली.