नवी दिल्ली-कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीवरून एएनआयच्या संपादकावर टीका केली आहे. पत्रकार स्वत: प्रश्न विचारत होते व स्वत: उत्तर देत होते असे आरोप राहुल गांधी यांनी केले आहे. यावरून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. पत्रकारांवर टीका करण्याच्या वृत्तीतून राहुल गांधींचा खरा डीएनए दिसून येतो अशी खरमरीत टीका केली आहे. ट्वीट करत अरुण जेटलींनी टीका केली आहे.
The Grandson of the ‘Emergency dictator’ displays his real DNA – attacks and intimidates an independent Editor.
— Arun Jaitley (@arunjaitley) January 3, 2019
या देशात ज्या इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू माध्यम स्वतंत्र हिरावले त्यांचे नातू असल्याचे राहुल गांधींनी सिद्ध केले अशी टीकाही अरुण जेटली यांनी केली आहे.
नवीन वर्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावरून मोदींवर टीका होत आहे. ९५ मिनिट ही मुलाखत झाली, त्यात विविध विषयांवर मोदींनी उत्तर दिले.
राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत मोदींची मुलाखत घेणारी ‘लचीली’ पत्रकार स्वत: प्रश्न करत होती व स्वत: उत्तर देत होती अशा शब्दात टीका केली आहे. स्मिता प्रकाश यांनी ही मुलाखत घेतली होती.