संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी उद्या शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला !

0

मुंबई: नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. यात पुन्हा भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएची सत्ता स्थापन होणार आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार उद्या २७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. साध्य दुष्काळी दौऱ्यावर असलेले शरद पवार यांनी इंदापूरला याबाबत माहिती दिली.

नवीन सरकार स्थापन होणार असून, सत्ता स्थापनेनंतर लागलीच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. सरकारकडे मोठ्या प्रमाणात धान्यसाठा असल्याने शासनाने दुष्काळी भागात धान्याचा पुरवठा करावा अशी मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.