भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार युनियनतर्फे संपासाठी मतदान ; 23 ते 25 जानेवारीदरम्यान तीन दिवसीय संपाचा इशारा
भुसावळ- नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह ऑर्डनन्स फॅक्टरीत खाजगीकरणाच्या शासन निर्णयाविरोधात आयुध निर्माणीसह संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी 23 ते 25 दरम्यान तीन दिवसीय लाक्षणिक संपावर जात आहेत. या संपाबाबत कामगारांचे मत जाणून घेण्यासाठी बुधवारी भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीत मतदान प्रक्रिया राबवण्यात आली तर 99 टक्के कर्मचार्यांनी संपाबाबत कल दर्शवला.
तीन मान्यताप्राप्त संघटना संपात उतरणार
संरक्षण क्षेत्रातील एआईडीईएफ, आईएनडीडबल्यूएफ व बीपीएमएस या तीनही मान्यताप्राप्त कामगार फेडरेशन तीन दिवसीय संपात उतरणार आहेत. भारत सरकारची कामगार विरोधी नीती, देशाचे राष्ट्रीय सुरक्षेचे हित लक्षात न घेता ऑर्डनन्स फॅक्टरीचे उत्पादन खाजगीकरण करण्याचा सरकारचा निर्णय, सर्व आयुध निर्माणीचे जवळपास 274 उत्पादन नॉन कोअर घोषित करून प्रायव्हेट सेक्टरला देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने त्याचा विरोध व 1 जानेवारी 2004 नंतर लागू नवी पेंशन योजना रद्द करुन जुनी पेंशन लागू करावी या मागण्यांसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
99 टक्के कामगार संपाच्या बाजूने
संपाबाबत भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीत मतदान घेण्यात आले. प्रशासनिक अधिकारी ए.के देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा अधिकारी एन.एस.सय्यद, लेबर ऑफिससे कार्यवेक्षक नितीन सोनवणे, नवीन मारूमर्दाने, नितीन लोखंडे, नवीन गायकवाड, आशिष परदेशी व ओमप्रकाश स्वामी, यांनी मतदान प्रक्रियेसाठी सहकार्य केले.
मतदानासाठी यांनी घेतले परीश्रम
युनियनचे प्रमुख किशोर पाटील, प्रवीण पाटिल, प्रवीण मोरे, दीपक भिडे, जितेंद्र आंबोडकर, किशोर बढे, मिलिंद ठोंबरे, नीलेश देशमुख, गिरीश येवले, गजानन इंगले, आशिष मोरे, प्रवीण डी.पाटील, हिरालाल परीसकर, दिलीप वायकोले, नितीन देशमुख, राजू निकम, विजू साळुंके, संदीप सोनवणे, विनोद तायडे, नितेश तायडे, सचिन परदेशी, कृणाल पाटील, अनिल लोखंडे, स्वप्निल वराडे, मोहन सपकाळे, जीतू मोरे, ईस्माइल तडवी, गजू शिंदे, लतेश वारुलकर, चेतन महाजन, सुरेश परदेशी, अनूप अग्निहोत्री, धनंजय पिंपळे, रवी सपकाळे, राजू जाधव, रोशन चौधरी, अतुल पाटिल, नितीन शिवरामे यांच्यासह यूनियन पदाधिकारी व सभासदांनी परीश्रम घेतले. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचे हित, निर्माणी हित व कर्मचारी हितासाठी संपाच्या बाजूने मतदान केल्याने युनियनच्या वतीने महासचिव दिनेश राजगिरे यांनी कर्मचार्यांचे आभार मानले. संपाची अधिकृत नोटिस 4 जानेवारी 2019 रोजी महाप्रबंधक यांना बजावण्यात येणार आहे. संपाबाबत अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघाचे उपाध्यक्ष व ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ राजेंद्र झा यांचे मार्गदर्शन लाभत आहे.