कोल्हापूर- संभाजी भिडे गुरुजी यांनी आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी संभाजी भिडे यांनी ही भेट घेतली असून या भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
संभाजी भिडे यांच्यावर भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी जनभावना भडकविण्याचे आरोप आहे. विरोधी पक्षांकडून भिडे यांना अटक करण्याची मागणी वारंवार होत आहे. मात्र अद्याप भिडे यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे सत्ताधारी विरोधकांसाठी टीकेचे धनी होत आहे. अशातच संभाजी भिडे यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.