धुळे : भीमा कोरेगाव दंगलीत शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिव प्रतिष्ठानच्या माध्यमातून भिडे गुरुजी देव-देश आणि धर्मासाठी कार्य करीत आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या कार्याची महती युवकांपर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहेत. भीमा कोरेगाव दंगलीच्या घटनेत त्यांचा कोणताही सहभाग नसतांना त्यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा निषेध करीत धुळ्यात मालेगाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदू सन्मान महामोर्चा काढण्यात आला.
यांची होती उपस्थिती
सरकारने दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत. संभाजी भिडे यांचे कार्याची दखल घेवून त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करावा, भीमा कोरेगाव घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी दिलेल्या निवेदनातून केली आहे. या मोर्चात संजय शर्मा, इंजि.रवी बेलपाठक, डॉ.योगेश ठाकरे, मनोज मोरे, संजय बोरसे, विजय पाच्छापूरकर, राजेंद्र खंडेलवाल, हर्षल गवळी, प्रदीप जाधव, निलेश देशमुख, प्रदीप पाटील, दिनेश कोळी यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.