संभाजी भीडे मराठ्यांची माथी भडकवत आहेत

0

सांगली । शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्याकडून मराठा समाजातील युवकांचे शोषण सुरु आहे, अशी टीका माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी येथे केली. केंद्र, राज्यातील सत्ताधारी भाजपशी संबंधित सर्व संघटना, घटकांनी समाजाच्या वाटण्या करण्याचा उद्योग सुरु केला आहे, असेही ते म्हणाले. ते म्हणाले,शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांचा कोरेगाव-भीमा येथील घटनेशी काही संबंध आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा काम करते आहे. मात्र ते टाळून मराठी युवकांना भिंडे व समर्थकांनी रस्त्यावर चुकीच्या पध्दतीने उतरवले. अनेक वर्षे ते मराठा युवकांचे शोषण पध्दतशीरपणे करीत आहेत, सांगली येथे ते बोलत होते.