चाळीसगाव । येथील सिग्नल पॉईंट येथे नियोजित जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व्हावा यासाठी 19 फेब्रुवारी रोजी नियोजित जागेवरच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार्या संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून त्यांची नंतर मुक्तता केली. त्यानंतर संभाजी सेनेच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.नियोजित जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे
18 फेब्रुवारीपर्यंत भूमिपूजन अथवा सकारात्मक निर्णय व्हावा अन्यथा शिवजयंतीदिनी संभाजी सेनेचे 21 सैनिक नियोजित जागेवर आत्मदहन करतील असा इशारा देण्यात आल्याने सिग्नल पॉईंट येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला. दुपारी अचानक संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ व कार्यकर्ते हातात रॉकेलच्या बाटल्या घेऊन घटनास्थळी आले व त्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतलेे प्रसंगावधान राखून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेले. नंतर त्यांची सुटका केली. त्यानंतर संभाजी सेनेचे लक्ष्मण शिरसाठ यांच्यासह आत्मदहन करण्यासाठी आलेले 21 कार्यकर्ते व इतरांनी घोषणा बाजी करत सिंगल पॉईंट येथे शिवजयंती साजरी केली.
Prev Post