संभाजी सेनेचे छ.शिवाजी महाराज चौकात ‘महाआरती’ आंदोलन

0

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नियोजित जागेवर व्हावा यासाठी आहे मागणी
दरमहिन्याच्या १९ तारखेला होणार महाआरती

चाळीसगाव – शहरात सिग्नल जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनेक वर्षांपासून प्रलंबित छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नियोजित जागेवर व्हावा या मागणीसाठी व पुतळ्याच्या कामाला प्रत्यक्ष लवकरात लवकर सुरुवात व्हावी, यासाठी त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईपर्यंत १९ सप्टेंबरपासून दर महिन्याच्या १९ तारखेला पुतळ्याच्या नियोजित जागेवर महाआरती आंदोलन सुरू केलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून १९ ऑक्‍टोबर रोजी दुसरी महाआरती घेण्यात आली.

उपस्थितांनी केले मार्गदर्शन
संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नियोजित जागेवर व्हावा, यासाठी संभाजी सेनेने अनेक वर्षांपासून लढा उभारला आहे. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामासाठी प्रत्यक्ष सुरुवात होत नाही तोपर्यंत दर महिन्याच्या 19 तारखेला याच नियोजित जागेवर महाआरती घेतली जाईल असे सांगितले. एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. विनोद कोतकर म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा चाळीसगाव करांच्या अस्मितेचा विषय असून येनकेन प्रकारे जे काही अडथळे असतील ते लवकरात लवकर दूर करण्यात यावा अनेक वर्षापासून विविध आंदोलन रुपी जो पाठपुरावा सुरू ठेवला संभाजी सेना ही निश्चितच कौतुकास पात्र आहे तसेच राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विश्वास भाऊ चव्हाण, नगरसेविका सविता राजपूत श्री रोग तज्ञ चेतना कोतकर राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सोनल साळुंखे, संभाजी सेना प्रदेश विधी सल्लागार, आधार मदत केंद्राच्या संस्थापिका ॲड आशा शिरसाठ यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
यावेळी नगरसेवक संजय पाटील, निवृत्त गटविकास अधिकारी मालती जाधव, प्रीती रघुवंशी, सुचित्रा राजपूत, सुलभा पवार, अश्विनी गोरे, कावेरी पाटील, संगीता जगताप, अनिता शर्मा, अनिता महाले, स्व.पप्पूदादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठानचे राहुल पाटील, सचिन फुलवारी, सामाजिक कार्यकर्ते शांताराम पाटील, छोटू पाटील, शाम ठाकूर आदी असंख्य शिवप्रेमी बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रदेश संघटक सुनिल पाटील यांनी केले तर आभार शहराध्यक्ष अविनाश काकडे यांनी मानले.

यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश काकडे, पप्पू मिस्तरी, गिरीश पाटील दिवाकर महाले, बंटी पाटील, रविंद्र शिनकर, सुरेंद्र महाजन, सुरेश तिरमली, नामदेव पाटील, ज्ञानेश्वर पगारे, संदीप जाधव, प्रवीण पाटील, भूषण मगर, रवींद्र नाईक, संजय अल्हाट, समाधान पाटील, कैलास ठाकरे, नारायण पाटील, बाळासाहेब देशमुख, प्रदीप पाटील, राहुल आहिरे, भैय्यासाहेब आहिरे आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.