संरक्षणमंत्र्यांच्या अरुणाचल दौर्‍याने चीनचा जळफळाट

0

नवी दिल्ली : संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी चिनी सीमेला लागून असलेल्या अरुणाचल प्रदेशातील सुदूर अंजा जिल्ह्याचा दौरा केला. संरक्षण सिद्धतेचा आढावा घेण्यासाठी हा दौरा केला.

मात्र, त्यांच्या दौर्‍यावर चीनने आक्षेप घेतला असून, सीतारामन यांनी वादग्रस्त भागात केलेला दौरा शांततेसाठी अनुकूल नाही, असे चीनने म्हटले आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी सीतारामन यांच्या दौर्‍यावर तीव्र आक्षेप नोंदवला. भारताने चीनसोबत संवाद कायम ठेवायला हवा. याच माध्यमातून हा प्रश्न सोडवता येऊ शकेल. दोन्ही देशांमध्ये संवादासाठी योग्य वातावरणदेखील आवश्यक आहे. चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी भारत चीनसोबत प्रयत्न करेल, अशी आशा आहे. यामधून दोन्ही देशांसाठी समाधानकारक असणारा तोडगा निघेल, असेही चुनयिंग म्हणाले.