संशयातून होणारी मारहाण रोखण्यासाठी कायदा करा-कोर्ट

0

नवी दिल्ली-देशभरात मुले पळवणाऱ्या टोळीच्या किंवा गोवंश तस्करीच्या संशयातून जमावाकडून निष्पापांची हत्या केल्याच्या घटना घडत आहे. सुप्रीम कोर्टानेही या घटनांवरुन केंद्र सरकारला फटकारले आहे. नागरिक कायदा हातात घेऊ शकत नाही, असे स्पष्ट करतानाच जमावाकडून होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी नवीन कायदा करावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने सरकारला दिले आहे.

संशयातून जमावाकडून झालेल्या मारहाणींसंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर आज मंगळवारी सुनावणी झाली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. भविष्यात जमावाने हत्या केल्याची घटना पुन्हा घडू नये, यासाठी राज्य सरकारने उपाययोजना कराव्यात, असे कोर्टाने सांगितले.