जळगाव। सिमी खटल्यातील संशयीत परवेज रियाजोद्दीन शेख याने सोमवारी अतिरीक्त सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांच्या न्यायालयात लेखी युक्तिवाद सादर केला. या खटल्याचा निकालाची सुनावणी 31 मार्च रोजी होणार आहे. सिमी खटल्यातील संशयीत असीफ खान बशीर खान याने गेल्या महिन्यात लेखी युक्तिवाद सादर केला होता. तर दुसरा संशयीत परवेज शेख याच्यातर्फे अॅड. सुनील चौधरी यांनी सोमवरी लेखी युक्तिवाद सादर केला. त्या युक्तिवादात शेख याने त्याच्या विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही, तसेच या प्रकरणातील साक्षीदार शेख सुपडू शेख साहेबू, शेख फारूख शेख अब्दुल्ला, शेख इक्बाल शेख रसूल यांना पुन्हा साक्षीसाठी बोलावले होते. मात्र त्यांनही साक्षीत परवेजच्या नावाचा उल्लेख केला नाही. एकूण 34 पानी सादर केलेल्या लेखी युक्तिवादात या प्रकरणाचा 19 मे 2006 रोजीच्या न्यायालयाच्या निकालाच्या प्रतिही जोडलेल्या आहेत. 2001 मध्ये या प्रकरणी 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचे दोषारोपपत्र 2006 मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यात 3 जणांना निर्दोष सोडले होते. तर 7 जणांना शिक्षा लागली होती. या खटल्याच्या निकालाची सुनावणी 31 मार्च रोजी होणार आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी कामकाज पाहिले.
जखमीचा मृत्यू
जळगाव। पिंप्राळा येथील रहिवासी विजय सोनकुवर यांचा 12 जानेवारी 2017 रोजी अपघात झाला होता. यात ते जखमी झाल्याने त्यांना शहरातील सहयोग क्रिटीकल या खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज सोमवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यांची वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी असता मृत घोषित केले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.