संशोधन व वैज्ञानिक क्षेत्रात भारताकडे जग आदराने बघतो!

0

जळगाव । औद्योगिक क्षेत्रात ज्या अडचणी भारतात आहे. त्याच अडचणी इतर देशातही आहेत. तरी सुद्धा जगात भारतीय बनावटचे तत्रज्ञान, संशोधन, वैज्ञानिक क्षेत्रात आदराने पाहिले जाते असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केले. शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात आयोजित तंत्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भारतीय तज्ञांनी उच्च कामगिरी करून आपल्या भारताचे नाव उच्च केले आहे. विशेष म्हणजे 30 टक्के वैज्ञानिक व शास्त्रज्ञ भारतीय वंशाचे आहेत. डॉ.ए.पी.जे.कलाम हे एक शास्त्रज्ञ असून ते राष्ट्रपती झाले असल्याचे त्यांन यावेळी सांगितले.

जिल्हाभरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
जिल्हाभरातील आयटीआय विभागात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी आयोजित जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात सहभाग नोंदवला होता. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थींनी वेगवेगळ्या इलेक्ट्रानिक साहित्यात मोटार वाईडींग, विजेच्या बचत करणारे यंत्र, चोरी सारख्या होणार्‍या घटनांवर आळा घालण्यासाठी आवाज करणार सर्किट, कमी विजेच्या मोटारीवर कटर, ग्राईंडर, ड्रिल मशिन, टेबल, खुर्ची, कपाट, फेब्रीकेशनपासून बनविलेले साधने, पवन चक्कीचा उपयोग, सौर उर्जावरील उपकरांचा वापर यासारखे तंत्र प्रदर्शनाचे करण्यात आले आहे. सुत्रसंचालन रेफ्रीजरेटर एअर कंडीशन विभागाचे शिक्षक आर.ए. चौधरी यांनी आभार मानले.

यांची होती उपस्थिती
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचनालय मुंबई यांच्याअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्यातर्फे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांची उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक विभागाचे अधिकारी एस.आर.सुर्यवंशी, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी डी.एस.वाघमारे, तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.बारी, जळगाव एमआयडीसीतील द्वारका इंडस्ट्रिजचे श्री.बोरोले, स्टार फेब्रीकेटरर्सचे श्री.पाटील, कस्तूरी इंडस्ट्रिजचे तुषार चौधरी, ब्युटीशियन दिशा पाठक, फाऊंडेशन ब्रेकचे महेश मोरे यांच्यासह जिल्ह्यातील शासकीय व खासगी आयटीआय संस्थेचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.