नवी दिल्ली-आज अपेक्षेप्रमाणे संसदेच्या सत्राला वादळी सुरुवात झाली. लोकसभेत राफेल करारावरून वादंग पेटले तर राज्यसभेत तिहेरी तालकवरून जोरदार हंगामा झाला.
तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. राज्यसभेत त्याला मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे. राज्यसभेत भाजपचे संख्याबळ कमी असल्याने राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर करणे सरकारपुढे आव्हान आहे. तिहेरी तलाकवरून राज्यसभेत ३१ डिसेंबरला गदारोळ झाल्याने कामकाज आज २ जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आले होते.
तिहेरी तलाक विधेयक जॉईन कमिटीकडे पाठवा अशी मागणी विरोधक करत आहे.