संस्कार प्रतिष्ठानतर्फे चिंचवडमध्ये स्वच्छता अभियान

0

पिंपरी-चिंचवड : महापालिका प्रभाग क्रमांक 18, संस्कार प्रतिष्ठान आणि टाटा व्हॉलेंटिअरींग, टाटा मोटर्स, टाटा टेक्नॉलॉजी, हिंजवडी यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड परिसरात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, मधुकर चिंचवडे, संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड, सोमनाथ पतंगे, हेमंत वाणी, अक्षय दशपुत्रे, शेखर तायडे, बालाजी डहाळके, महारूद्र गिरी, आरोग्य अधिकारी के. बी. पारोळ, निंबाळकर आदींनी सहभाग नोंदविला होता.

याठिकाणी केली स्वच्छता
या अभियानांतर्गत चिंचवडमधील केशवनगर माध्यमिक शाळा ते काळेवाडी ब्रिजपर्यंत स्वच्छता करण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत काढण्यात आले. परिसरातील प्लास्टिकचा कचरा संकलित करण्यात आला. या अभियानात सुमारे दोन टन गवत व पाच पोती प्लास्टिकचा कचरा जमा करण्यात आला. परिसरातील नागरिकांनीही स्वच्छेने अभियानात सहभाग नोंदविला.