सयाजीराव गायकवाड संमेलन नगरी (नित्यानंद भिसे)।
91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शुक्रवारपासून बडोदानगरीत सुरू झाले. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत उद्घाटन सोहळा, चर्चासत्रे, ग्रंथ दिंडी, कविसंमेलने आदी अनेक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती. साहित्यिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि साहित्याने भारावलेले वातावरण यामुळे बडोद्याची सयाजीराव गायकवाड संमेलन नगरी दुमदुमून गेली आहे. साहित्य महामंडळाचे सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण, संमेलनाच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन, महाराष्ट्र शासनातर्फे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या चरित्रग्रंथाच्या बारा खंडांचे प्रकाशन, श्रीनिवास पाटलांच्या शब्दकोट्या आणि त्यामुळे साहित्यीकांमध्ये माजलेला हास्यकल्लोळ, अशा घटनांनी साहित्य संमेलनाचे वातावरण ढवळून निघाले. नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रश्नावरून साहित्य संमेलनांमध्ये वाद निर्माण झाले आहेत. मात्र या साहित्य संमेलनात आतापर्यंत तरी सारे कसे सुरळीत पार पडल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांनी पुढील वर्षापासून संमेलनाच्या अनुदानाची रक्कम दुप्पट करणार असल्याची केलेली घोषणा सर्वांनाच सुखावून गेली आहे.
विठ्ठलनामाचा जयघोष आणि ढोलताशांचा गजर
ग्रंथदिंडीने साहत्यनगरीला पहिली सलामी दिली. सयाजीराव गायकवाड संमेलन नगरी, बडोदा- ज्ञानोबा-तुकारामांचा गजर, विठ्ठलाचा अखंड नामघोष, ढोलताशांचा गगनभेदी ध्वनी, लेझीमचा ताल आणि मराठमोळ्या वेशात नटून सजून आलेले बडोदेकर मराठीजन अशा भारावलेल्या वातावरणात अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडी पार पडली. येथील लक्ष्मीविलास पॅलेसच्या प्रवेशद्वारी मावळते अध्यक्ष अक्षयकुमार काळे, नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी, तुकारामाचे अभंग, भगवद्गीता या ग्रंथांसह राज्यघटनेचे पूजन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या महागजरात दिंडीला प्रारंभ झाला. विविध शाळांचे विद्यार्थी विविध वेशभूषेत सहभागी झाले होते. तर भजनी मंडळ, महिला मंडळ, वारकरी, चित्ररथांचा सहभाग यातून दिंडीला वेगळाच रंग चढला होता.
साहित्य महामंडळाचे ध्वजारोहण
सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रथेप्रमाणे साहित्य महामंडळाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मावळते अध्यक्ष अक्षयकुमार काळे, मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष श्रीपाद जोशी, संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर आदी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनातर्फे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या चरित्रग्रंथाच्या बारा खंडांचे प्रकाशनचेही प्रकरण चि. मेहता सभागृहात करण्यात आले. संमेलनाच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनात प्रथमच संमेलनाच्या अध्यक्षांच्या साहित्याचा स्टॉल ठेवण्यात आला आहे. या स्टॉलवर मान्यवरांनी पुस्तके चाळली. गुजरात आणि बडोद्यातील 23 कवींचा प्रातिनिधिक संग्रह तसेच कवी विंदा करंदीकर यांच्यावरील कॅलेंडरचे प्रकाशन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते झाले.
सयाजीराजांची अशीही ओळख
सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रथेप्रमाणे साहित्य महामंडळाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मावळते अध्यक्ष अक्षयकुमार काळे, मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष श्रीपाद जोशी, संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर आदी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनातर्फे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या चरित्रग्रंथाच्या बारा खंडांचे प्रकाशनचेही प्रकरण चि. मेहता सभागृहात करण्यात आले. संमेलनाच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनात प्रथमच संमेलनाच्या अध्यक्षांच्या साहित्याचा स्टॉल ठेवण्यात आला आहे. या स्टॉलवर मान्यवरांनी पुस्तके चाळली. गुजरात आणि बडोद्यातील 23 कवींचा प्रातिनिधिक संग्रह तसेच कवी विंदा करंदीकर यांच्यावरील कॅलेंडरचे प्रकाशन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते झाले.
शब्दकोट्या आणि हास्य फवारे
राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी आपल्या भाषणात शब्दांच्या कोट्या करून उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकवला. ‘एखाद्या गोष्टीला ताव आल्याशिवाय ठोका बसत नाही मग त्यावेळी म्हणावे लागते ‘ताव दे’ मराठवाड्याच्या कॅबिनेटच्या बैठकीत बाबांनी तावडेंना काय सांगितले कुणास ठाऊक पण खंड प्रकाशाचे काम मार्गी लागले असे खरात म्हणले, त्यावर- बाबा काहीतरी म्हणाले असतील, पण तावडे घाबरले. कारण बाबांच्या पुढे भांड शब्द आहे. पण या कामामुळे आता बाबा भांडार झाले आहेत.’ या वक्तव्यावर चांगलाच हशा पिकला.
‘या शहराचे नावच बडोदा आहे. बडोद म्हणजे मोठे होणे, अशा कार्यक्रमाने ते अधिक मोठे होणार आहे. आषाढीला पंढरपूरला जावं, देहू आळंदीला निघावं, टाळ घेऊन नाचावं. हे खंडही या संमेलनगरीत घेऊन नाचण्यासाठीच प्रकाशित झाले’, असे पाटील म्हणाले. महाराष्ट्र शासनाने हे मोठे काम केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी पायाभरणी केली तेच काम समता, बंधुत्व आणी सत्कार्य या आधारावर सायाजीराजांनी केले. त्यांच्यावरील या खंड प्रकाशनाने आता त्यांची नव्याने ओळख होईल. हे काम आजपर्यंत का झाले नाही त्याची खंत होती. किंबहुना त्यांनी अनेक महापुरुषांना घडवले, पण त्यांना राष्ट्रीय मान्यता मिळाली नव्हती ती या खंडांतून मिळेल, अशी आशा वाटते, असे मत शुभांगिनीराजे गायकवाड यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांपर्यंत चांगलं पोहोचवा!
आपला इतिहासाचा अभ्यास बघा औरंगजेब, महाराजांनी काढलेला कोथळा, आग्रा येथून सुटका, सुरतेवर छापा या पलीकडे जातच नाही. पण, महाराजांच्या काळातील दुष्काळ, त्यावेळी त्यांनी केलेली कामे, पर्यावरण व्यवस्थापन, हेर व्यवस्था असे चांगले प्रशासन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. ते आता आपण अभ्यासक्रमात थोडे थोडे आणतो आहोत. देश स्वातंत्र्यानंतरचा इतिहास नाही का? 1947 ते 2000 या काळातील ज्या ज्या महत्त्वाच्या घटना आहेत त्या मुलांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्यामुळे या अभ्यासक्रमात बदल होण्याची गरजही विनोद तावडे यांनी व्यक्त केली.
‘सयाजीराजांचे चरित्रग्रंथ प्रकाशित करून महाराष्ट्र शासनाने हे त्यांची ओळख महाराष्ट्राला करून देण्याचे काम केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी पायाभरणी केली तेच काम समता, बंधुत्व आणि सत्कार्य या आधारावर सयाजीराजांनी केले. त्यांच्यावरील या खंड प्रकाशनाने आता त्यांची नव्याने ओळख होईल. हे काम आजपर्यंत का झाले नाही त्याची खंत होती. किंबहुना त्यांनी अनेक महापुरुषांना घडवले, पण त्यांना राष्ट्रीय मान्यता मिळाली नव्हती. ती या ग्रंथाच्या खंडांतून मिळेल अशी आशा वाटते.’
-श्रीमंत शुभांगिनीराजे गायकवाड
स्वागताध्यक्ष, संमेलन.
25 खंड करण्याचा मानस
मराठी भाषेत 6000 पानांचे 12 खंड त्यात 2 खंड भाषणांचे, 1 गौरवगाथा तर 3 खंड हे पात्रांचे आहे, तर इंग्रजीत 2 भाषणांचे आणि 4 पात्रांचे खंड प्रकाशित झाले आहेत. पूर्ण 25 खंड तयार करण्याचा प्रकाशन समितीचा मानस असल्याचे चरित्र साधने प्रकाशन समितीचे सचिव बाबा भांड यांनी सांगितले.
कविकट्ट्यातून कवींच्या सृजनशीलतेेला उभारी
बडोदा । यंदाच्या साहित्य संमेलनात कविकट्टा उभारण्यात आला आहे. माधव ज्युलियन सभागृहात राजकवी चंद्रशेखर शिवराम गोर्हे व्यासपीठावर संमेलनातील तीन दिवस राज्यातील कानाकोपर्यातून आलेले कवी आपल्या पद्य प्रतिमेला उजाळा देत कवितेच्या सृजनशीलतेला उभारी देणार आहेत. त्यामुळे हा कविकट्टा संमेलनाचे विशेष आकर्षण बनले आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमधील मराठी कवींना या ठिकाणी उत्तम व्यासपीठ मिळाले आहे. या 3 दिवसांत सुमारे 520 कवितांचे सादरीकरण यानिमित्ताने करण्याचा मानस ठेवण्यात आला होता.
कविकट्ट्याचे उद्घाटनही शानदारपणे झाले. त्यावेळी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे आदी उपस्थित होते. बडोद्यातील 91 कवींच्या कवितांचा संग्रह काव्यगाथा याचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. बडोद्याचे आद्यकवी वामनबुवा वायटीकर यांना हा काव्यग्रंथ अर्पण करण्यात आला. यावेळी बोलतांना राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी कवींच्या मनाच्या प्रत्येक कोपर्याला स्पर्श केला. कविता करणे म्हणजे विटेवर वीट रचणे नव्हे, नामदेवाने फेकलेल्या विटेवर पांडुरंग उभा आहे, त्या विटेला आपण सर्वजण नमस्कार करतो, तशी वीट कुसमाग्रज, सुरेश भट, ग. दी. माडगुळकर यांनी फेकलेली आहे. त्याला वंदन करा. आपल्या माणसावर लिहिण्यासाठी आपण शाही खर्च करत नाही. उलट एकमेकांचे कौतुक करा, त्यांना प्रोत्साहन द्या, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले, तर सध्या कवींची संख्या पाहता कवितेचे पीक उदंड आहे, पण ते आपले नाही. प्रत्येक व्यक्तीला अनुभव येतोच असे नाही, पण जी अनुभूती तुमच्या मनाला भावते, त्यावरच तुम्ही कविता केली पाहिजे. कवी केशवसूत सांगतात, सहानुभूती अर्थात कवीला आलेली अनुभूती तसेच तादात्म्य आणि कविता ऐकण्याचा धीर या तीन गोष्टी कविता ऐकण्यासाठी गरजेच्या असतात. रसित न मिळणे ही बोंब फार आधीपासूनची आहे. म्हणून कवितांचा दर्जा घसरून चालणार नाही.