संस्कृती बालगुडे आणि सुमेधची मैत्री अगदी खास

0

मुंबई : अभिनेत्री संस्कृती बालगुडे आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर खूप ऍक्टिव्ह असते. गेले काही दिवस तिच्या इन्स्टापोस्ट आणि स्टोरीज या अभिनेता सुमेध मुदगलकरविषयी जास्त असतात. अशावेळी अर्थातच तिच्या फॉलोअर्सना सध्या तिच्यात आणि सुमेधमध्ये नक्की काय सुरू आहे, याची उत्सुकता आहे.

संस्कृती आणि सुमेधची नुकत्याच एका प्रोजेक्टच्या निमित्ताने मैत्री झाली. दोघंही समवयस्क असल्याने मैत्री ही प्रोजेक्टपूरती न राहता, मग ती घट्ट मैत्रीत रूपांतरीत झाली. त्यामूळे फक्त संस्कृतीच नाही तर सुमेधच्याही इन्स्टापोस्ट आणि स्टोरीजमध्ये संस्कृतीच असते.

संस्कृती बालगुडेला यासंदर्भात विचारणा केल्यावर ती हसून म्हणते, “हो, सुमेध आणि मी नुकताच एक व्हिडीओ अल्बम शूट केलाय. उत्तम लोकेशन्स, श्रवणीय संगीत असलेला हा म्युझिक अल्बम लवकरच तुमच्या भेटीला येईल. “