मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री सई ताम्हणकर आता वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजचा पहिला टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
सईचा एक चाहता सईला कानोकान खबर न लागता तिच्यावर सतत नजर ठेवत असतो. यानंतर तो सईवर चित्रपट निर्मिती करतो. या चित्रपटासाठी तो चाहता सईच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडवून आणतो, याभोवतीच या वेबसीरिजचं कथानक फिरताना टीझरमधून दिसत आहे. ‘डेट विथ सई’असे या वेबसीरिज चे नाव आहे. येत्या ५ डिसेंबरपासून ही बेवसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.