मराठ्यांना सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) करून आरक्षण देण्यास मंजुरी
वडगाव मावळमधील अमोल पिंगळेला मिळाला पहिला दाखला
कामशेत : अनेक वर्षांपासूनच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला शासनाच्यावतीने हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. नोकरीमध्ये आणि शिक्षणासाठी 16 टक्के आरक्षण सरकारने मंजूर केले आहे. गेले काही दिवस या आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने संपूर्ण राज्यात जोरदार निदर्शने, मोर्चा सुरू होते. आरक्षण मंजुर होण्यासाठी 3 ते 4 कार्यकर्त्यांनी आपले बलिदान दिले आहे. त्यामुळे मोठी लढाई पार पाडल्यावर मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मंजुर झाले आहे. आता ठिकठिकाणी सेतु कार्यालयांमध्ये मराठा आरक्षणाचा दाखला देण्याचे काम सुरू झाले आहे. त्यानुसार मराठा समाजाचा पहिला दाखला मावळ तालुक्यातील साई गावातील अमोल पिंगळे या तरुणाला शनिवारी ‘एसईबीसी’चा दाखला देण्यात आला. मराठा समाजातील लोकांना सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) करून आरक्षण देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
हे देखील वाचा
एमपीएससीमध्ये राखीव जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पद भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर असल्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थी आरक्षण दाखला मिळविण्यासाठी नागरी सुविधा केंद्रात गर्दी करीत आहेत. मात्र हा दाखला मिळण्यास उशीर लागत असल्याचे सांगण्यात येत आहेत. मराठा समाजातील मुलांना शैक्षणिक व नोकरीत आरक्षण मिळविण्यासाठी एसईबीसीचा दाखला गरजेचा आहे. त्यामुळे मावळातील नागरी सुविधा केंद्रात नागरिक एसईबीसी’चा दाखला मिळविण्यासाठी रांगा लावत आहेत. त्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांची भरती करण्यात येणार असून, या भरतीमध्ये ‘एसईबीसी’साठी राखीव जागा असल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना या दाखल्याची आवश्यकता आहे.
विद्यार्थ्यांना आरक्षण वरदान
वडगाव मावळ तालुक्यातही मो÷ठ्या प्रमाणात मराठा समाज आहे. अनेकांना वाढत्या महागाईमुळे शिक्षण घेणे दुरापास्त होत आहे. त्यातच आता एमपीएससी, युपीएससीमध्ये राखीव जागा या अनुसुचित जातीच्या लोकांना मिळत होते. त्यामुळे तेथेही पैसे भरून शिक्षण घेणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे सरकारने दिलेल्या या आरक्षणामुळे अनेक इच्छुक आणि हुशार विद्यार्थ्यांना हे आरक्षण मोठे वरदान ठरणार आहे. उच्चशिक्षण, स्पर्धा परिक्षा, सरकारी नोकरीमधील भरती यामध्ये त्यांना राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. नाणे मावळातील साई येथील अमोल काळू पिंगळे याला नुकताच ‘एसईबीसी’चा दाखला मावळात सर्वप्रथम मिळाला असल्याने हा दाखला मिळविण्याची प्रक्रिया सोपी असल्याची स्पष्ट झाले आहे.