सकल लेवापाटीदार समाजाचे मनोमिलन होणे गरजेचे

0

वरणगाव – काही काणास्तव दिडशे वर्षापूर्वी लेवा पाटीदार, थोरगावणकर, नऊघरे, बाराघरे असी स्वतंत्र समाज निर्मिती झाली. अगोदरचा इतिहास पाहिला तर हे सर्व समाज एकत्र होते. समाजाची विभागणी झाल्याने भाऊबंदकी देखील संपुष्टात आली. त्यावेळेसपासून तर आजतागायत भिंतीला भिंत असली तरी मनापासून सर्वजण एकमेकांपासून दूर झालो आहोता त्यामुळे की काय समाजाचा विकास खुंटला आहे. या सर्वांनी एकत्र आल्यास समाजाची नवीन एक ताकद निर्माण होवू शकते, असा आशावाद माजी जिल्हा परीषद सदस्य राजेंद्र चौधरी यांनी येथे व्यक्त केला. विल्हाळे येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सामाजिक कार्यकर्ता संजीव कोलते, बापू महाजन, भरत चौधरी, सुभाष चौधरी, डी.के.महाजन आदी उपस्थित होते. यावल, वाघोदा, थोर गव्हाण, पिंपळगाव, विल्हाळे, गाते, साकेगाव, वरणगाव, फुलगाव, अट्रावल, ऑर्डनwन्स फॅक्टरी या गावांमधे याबाबत बैठका झाल्या आहेत. या गावातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मेळावा देखील घेण्याचा नियोजन असल्याचे सांगण्यात आले. चौधरी म्हणाले की, समाज एकत्र येण्यासाठी वरीष्ठ पातळीवर माजी आमदार आर.आर. पाटील, यावलचे माजी नगराध्यक्ष चंद्रकात देशमुख, जळगाव येथील राणे परिवार, विलास राणे यांच्या नेतृत्वाखाली गावो गावी जावून सर्व समाज बांधवाना एकत्र करण्याचे काम सुरू आहे. याकरीता सर्वांनी एकत्रीत काम केले पाहिजे. त्यातूनच समाजाची उन्नती होईल.