सकारात्मक पालकत्वातून घडतात ‘स्मार्ट मुले’

0

भुसावळ येथे मानसशास्त्रीय समुपदेशक निलेश गोरे यांचे प्रतिपादन

भुसावळ- मुलांनी यशस्वी होण्यासाठी पालकांनी त्यांच्या पाठीवर हात ठेवून फक्त ल, असे म्हणायची गरज आहे. पालकांनी पाठिंबा दिल्यास मुलांना कोणतेही यश दूर नसते, हे अनेक आयएएस, आयपीएस अधिकार्‍यांनी सिद्ध केले आहे. सकारात्मक पालकत्वातून ‘स्मार्ट मुले’ घडतात, असे विचार मानसशास्त्रीय समुपदेशक निलेश गोरे यांनी येथे व्यक्त केले. रेल्वेच्या संयुक्त स्टाफ क्लबने पालकांसाठी रंगभवनात मार्गदर्शनपर व्याख्यानाच आयोजन केले होते. याप्रसंगी गोरे हे बोलत होते.

मानसिक परिस्थिती जाणल्यानंतर टळतात अनर्थ
निलेश गोरे मार्गदर्शनात म्हणाले की, अनेकदा पालक मुलांवर अभ्यासाचा दबाव टाकतात पण मुलं किती अभ्यास करू शकतात? हे समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि मग मुलांना मानसिक आजारांनी घेरलं जातं. पालकांनी आधी मुलांची मानसिक स्थिती समजणे गरजेचे आहे. जर पालकांनी मुलांना समजून घेतलं तर अनर्थ टाळतात, असेही गोरे म्हणाले. तुमची मुले जेव्हा पाहतात की तुम्ही कसा विचार करता, कसं वागता तेव्हा त्यांनाही तुमच्या उदाहरणावरून बरंच काही शिकायला मिळतं. तुम्ही काय करता हे ते पाहत असतात. त्यामुळे, तुमचा विश्‍वास व विचार मजबूत करत रहा, असे सांगून गोरे म्हणाले की, मुलांचे मित्र बना व मित्र म्हणून मार्गदर्शन करा. प्रत्येकवेळी पालकांनी तू असेच केले पाहिजे, अमुक एका मुलाला तुझ्यापेक्षा जास्त मार्क्स मिळाले, अमूकला कमी वयात नोकरी लागली असे मुलांना वारंवार सांगून त्याचे मानसिक खच्चीकरण करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. करण्याची गरज नाही. अन्यथा नंतर मुलाने आत्महत्या केली म्हणून हळहळण्यात काही अर्थ नाही. प्रकल्प प्रमुख धनंजय महाजन यांनी आभार मानले. डी.बी.महाजन, आर.वाय.भोळे, एम.पी.चौधरी, वाय.ए.कोल्हे , पी.आर.पाटील आदींची उपस्थिती होती.