सकारात्मक विचार, कठोर परिश्रम, निष्ठा हे मुलमंत्र- संतोष तोत्रे

0

जी.एम.आय.कन्याशाळेतर्फे व्याख्यानाचा कार्यक्रम

खडकीः सकारात्मक विचार, कठोर परिश्रम व ध्येयपुर्ततेची निष्ठा हे यशस्वी जीवनाचे मुलमंत्र आहे, असे विचार जीवन विद्या मिशनचे ज्येष्ठ प्रवचनकार संतोष तोत्रे यांनी व्यक्त केले. खडकी शिक्षण संस्थेच्या जी. एम. आय. कन्या शाळेच्यावतीने विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्गा करीता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तोत्रे उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष विलास पंगुडवाले, सचिव आनंद छाजेड, ज्येष्ठ संचालक ज्ञानेश्‍वर मुरकुटे, राजेंद्र भुतडा, रमेश अवस्थे, महादेव नाईक तसेच मिशनचे महेंद्र मारणे, भगवान क्षीरसागर, सुरेश पन्हाळे, मुख्याध्यापिका साधना कोर्‍हाळे, पर्यवेक्षिका मनीषा राठोड, शिक्षक प्रतिनिधी सुनिता बारगजे आदी उपस्थित होते.

चांगल्या गुणांची सांगड घाला
तोत्रे पुढे म्हणाले की, जीवनात जे करायाचे ते मनापासुन करा. व्यसन, वाईट सवयी यांच्या आहारी जाऊ नका. चांगले गुण चांगल्या सावयी यांची सांगड घाला. आई-वडीलांची स्वप्ने पुर्ण करण्याकामी स्वःताला झोकुन द्या. पुन्हा पुन्हा वाचा, लक्षात ठेवा, लिहुन काढा या अभ्यास कला गुणांचे धडे दिले. संस्थेचे अध्यक्ष गोयल म्हणाले की, आजच्या आधुनिक युगातील यशस्वी जीवनाचे मुलमंत्र विशद केले. प्रास्तविक मनीषा राठोड यांनी केले तर सुत्रसंचालन दिलीप कांबळे यांनी तर आभार ज्योती सातपुते यांनी मानले. पाहुण्यांचा परिचय हेमलता कोंडे यांनी करुन दिला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता मिनाक्षी गायकवाड, प्रज्ञा इंगळे, हेमलता कोंडे, दिलीप कांबळे तसेच कर्मचारी वर्गांनी विशेष परिश्रम घेतले.