सकारात्मक विचार करण्याची सवय अंगीकारणे महत्त्वाचे

0

जळगाव । प्रत्येक क्षेत्रात विकास साध्य करण्यासाठी बदल अपेक्षित आहे. तुमच्या छोट्या विचारातूनही मोठा बदल घडू शकतो. त्यासाठी सकारात्मक विचार करण्याची सवय अंगीकारणे महत्वाचे आहे. सामाजिक विसासाबरोबर स्वतःचा विकास करण्यासाठी स्वार्थी वृत्तीने अभ्यास व मेहनत करा. यामुळे तुमचा विचार तुम्हाला अगोदर येईल नंतर इतरांचा. स्वत: विकसित झालेत म्हणजे सामाजिक विकास करण्यास आपण मुक्त असतो. यासाठी हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्टवर्क करा असे मत उद्योजक अभिनव सिन्हा यांनी व्यक्त केले.

शोध निबंधांची सीडी प्रकाशन
जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमध्ये एम.बी.ए.विभागाची ई.कॉमर्स इनोव्हेशन आणि बिझनेस एक्सलन्स या प्रमुख विषयासह 3 फेब्रुवारी रोजी आयोजित राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. परिषदेत शिक्षण विभागातून प्राध्यापक, रिसर्च स्कॉलर, विद्यार्थी व उद्योग क्षेत्राशी संबंधित संशोधकांनीही शोध निबंध सादर केलेत तसेच शोध निबंधांची सीडीचे प्रकाशन करण्यात आले.

विद्यार्थ्यांसह प्राध्यपकांचा सहभाग
सूत्रसंचालन प्रा. विजय गर्गे यांनी तर आभार विनिता कलराणी यांनी मानले. परिषदेत एम.बी.ए विभाग व ई.कॉमर्स क्षेत्राशी निगडीत संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता. यशस्वीतेसाठी प्रा.राज कांकरिया, प्रा.प्रशांत देशमुख, प्रा.तन्मय भाले, प्रा.शमा पोतनीस, प्रा.कविता पाटील, प्रा.योगिता पाटील यांनी कामकाज पाहिले.

नाविन्यता दाखविण्याची कल्पकता आवश्यक
प्रमुख पाहुणे म्हणून एक्सिस बँकेचे सह व्यवस्थापक विजय अगरवाल संयोजक प्रा.मकरंद वाठ, प्रा.दीपक शर्मा, प्रा.अनिल शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच परिषदेचे प्रमुख आयोजक म्हणून संचालिका डॉ.प्रिती अगरवाल यांचे मार्गदर्शन लाभले. पुढे बोलताना ते म्हणाले, नोकरी आणि व्यवसाय यात फारसा कामाचा फरक नसतो. नोकरीत वेळ ठरलेली असते व्यवसायात वेळेचे बंधन नसते. छोट्या व्यवसायातूनही जगाला नाविन्यता दाखविता येते. मात्र नाविन्यता दाखविण्याची कल्पकता आपल्यात असावी लागते असेही त्यांनी सांगितले.